मॉन्टेनेग्रोमध्ये शुक्रवारी अंदाधुंद गोळीबाराची घटना समोर आली आहे. येथील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बंदुकधारी व्यक्तीसह 12 जण ठार झाले, तर सहा जण जखमी झाले. मॉन्टेनेग्रोमधील पश्चिमेकडील सेटिन्जे शहरातील घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी अधिक तपशील देण्यास आणि घटनेवर टिप्पणी करण्यास नकार दिला.
कौटुंबिक वादानंतर सेटिनजे येथील एका व्यक्तीने लहान मुलांसह रस्त्यावरील लोकांवर यादृच्छिकपणे गोळीबार केला, 12 लोक ठार झाले आणि सहा जण जखमी झाले. मात्र, नंतर हल्लेखोर पोलिसांच्या गोळ्यांनी ठार झाला.
एका खळबळजनक घटनेने शहरवासी हादरले आहेत , असे मॉन्टेनेग्रोचे पंतप्रधान ड्रिटन अबाजोविक यांनी त्यांच्या टेलिग्राम चॅनेलवर लिहिले. तसेच त्यांनी सेटींजेच्या सर्व जनतेला निरपराध पीडितांच्या कुटुंबीयांसह, त्यांचे नातेवाईक आणि मित्रांसोबत राहण्याचे आवाहन केले. याशिवाय देशात तीन दिवसांचा दुखवटाही जाहीर करण्यात आला आहे.