श्रीलंकेत इंधनाच्या तुटवड्यामुळे पेट्रोल पंपावर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. इंधन वितरणाचे व्यवस्थापन आणि देखरेख करण्यासाठी मंगळवारी पेट्रोल पंपांवर लष्कर तैनात करावे लागते, अशी परिस्थिती आहे. परकीय चलनाच्या कमतरतेमुळे देशात मोठे आर्थिक आणि ऊर्जा संकट निर्माण झाले आहे.
इंधनासाठी रांगेत उभ्या असलेल्या लोकांमधून आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. परकीय चलनाच्या संकटामुळे इंधन, स्वयंपाकाचा गॅस आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची आयात ठप्प झाली आहे. श्रीलंका सरकारने भारताकडे कर्जाची मदत मागितली होती, त्यानंतर भारताने गेल्या आठवड्यात आर्थिक संकटावर मात करण्यासाठी एक अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले.