चीन: वर्षभरानंतर प्रथमच कोरोनामुळे दोन मृत्यू

मंगळवार, 22 मार्च 2022 (15:56 IST)
जगभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना शनिवारी चीनमध्ये कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. जानेवारी 2021 नंतर प्रथमच चीनमध्ये मृत्यूची नोंद झाली आहे. चीन दोन वर्षांनंतर सर्वात वाईट कोरोना परिस्थितीशी झुंज देत आहे. आजकाल चीनमध्ये आढळून आलेली कोरोना प्रकरणे ओमिक्रोन  व्हेरियंट तील आहेत. 
 
चीनच्या ईशान्य जिलिन प्रांतात कोरोनामुळे दोन लोकांचा मृत्यू झाल्याने देशातील कोविड-19 मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या 4,638 झाली आहे. चिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी कोरोनामुळे मृत्यू झालेले दोघेही वृद्ध होते आणि त्यापैकी एकाला कोरोनाची लस देण्यात आलेली नव्हती. शनिवारी चीनमध्ये कोरोनाचे 2,157 नवीन रुग्ण आढळले आहेत. यातील बहुतांश प्रकरणे जिलिन प्रांतातून आली आहेत.
 
जिलिन प्रांताने कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे प्रवासावर बंदी घातली आहे, ज्यामुळे लोकांना सीमेपलीकडे प्रवास करण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असेल. चीनमध्ये या वर्षाच्या मार्चच्या सुरुवातीला 29,000 हून अधिक कोरोना रुग्ण आढळले. यासाठी लाखो लोकांची कोरोना चाचणी सुरू आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती