सध्या लसीकरण धोरणांतर्गत, कोविडशील्डच्या पहिल्या डोसनंतर 12 ते 16 आठवड्यांनंतर दुसरा डोस दिला जातो. लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने (NTAGI) भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या दोन डोसमधील 28 दिवसांच्या कालावधीत बदल केलेला नाही.
सध्या, एनटीएजीआई ने कोविशील्ड वर दिलेला प्रस्ताव अद्याप अंमलात आणणे बाकी आहे. एका अधिकृत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सल्लागार गटाचा प्रस्ताव जागतिक स्तरावर करण्यात आलेल्या अलीकडील काही वैज्ञानिक अभ्यासांच्या आधारे तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत, जेव्हा कोविशील्डचा दुसरा डोस आठ आठवड्यांनंतर दिला जातो तेव्हा त्याद्वारे तयार केलेल्या अँटीबॉडीज चा प्रतिसाद 12 ते 16 आठवड्यांच्या दरम्यान दुसरा डोस दिल्यानंतर सारखाच असतो.
सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिल्यास लाभार्थ्यांना कोविशील्डचा दुसरा डोस जलद मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असे सांगण्यात आले आहे. सध्या देशात 60 ते 70 दशलक्ष लोक असे आहेत ज्यांना या लसीचा दुसरा डोस मिळालेला नाही, कोरोना विषाणूने जगभरात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.