आयुष गणेश कोमकरच्या हत्येप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर यांच्यासह अकरा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. या प्रकरणात आयुषची आई कल्याणी कोमकर (रा. भवानी पेठ) यांनी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे आणि त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. अमित पाटोळे आणि यश पाटील अशी त्यांची नावे आहेत.
शुक्रवारी (ता. 5) सायंकाळी 7:30 वाजता नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये आयुषची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आयुष कोमकर हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येतील आरोपी आहे. वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आयुषची हत्या केल्याचे बोलले जात आहे. पाच दिवसांपूर्वी आंदेकर टोळीने आंबेगाव पठार परिसरातील सोमनाथ गायकवाड आणि अनिकेत दुधाभाते यांच्या घरांची तपासणी केली होती.
वनराजच्या हत्येचा आरोपही या दोघांवर आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी टोळीतील दत्ता काळे याला अटक केली होती. त्यावेळी आंदेकर टोळी वनराजच्या हत्येचा बदला घेण्याची तयारी करत असल्याचे उघड झाले होते. शुक्रवारी गणेशचा मुलगा आयुष कोमकर याची आंदेकर टोळीने हत्या केली. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा टोळीयुद्धाच्या माध्यमातून हत्यांचा टप्पा सुरू झाल्याचे दिसून येते.
पुण्यातील नाना पेठ परिसरात संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी भीषण गोळीबार झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा थेट बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने धाडसी पाऊल उचलले. कुख्यात आरोपी गणेश कोमकर यांचा मुलगा गोविंद कोमकर याची आज गोळ्या घालून हत्या करण्यात आली . या हत्येचा मोठा कट यापूर्वीच आखण्यात आला होता, परंतु पोलिसांनी कट उधळून लावला... तरीही, आंदेकर टोळीने हार मानली नाही आणि पुन्हा एकदा शस्त्रे दाखवत गोविंद कोमकरची निर्घृण हत्या केली.