दानिश सिद्दिकी यांचा अफगाणिस्तानमध्ये रिपोर्टिंग करताना मृत्यू

शुक्रवार, 16 जुलै 2021 (18:39 IST)
प्रसिद्ध भारतीय फोटोजर्नलिस्ट दानिश सिद्दिकी यांचा अफगाणिस्तानमध्ये रिपोर्टिंग (बातमीदारी) करताना कंधाहारमध्ये मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानचे भारतातले राजदूत फरीद मामुन्दजई यांनी त्यांच्या मृत्यूचं वृत्त ट्विट करून दिलं आहे.
 
रॉयटर्स या वृत्तसंस्थेसाठी ते काम करत होते. अफगाणिस्तानात बातमीदारी करताना त्यांचा मृत्यू झाला आहे.
 
दानिश यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत टिपलेल्या अंत्यसंस्कारांच्या फोटोंची खूप चर्चा झाली होती.
 
2020 मध्ये राजधानी नवी दिल्लीत झालेल्या दंगलीत त्यांनी काढलेले फोटोसुद्धा चर्चेचे विषय ठरले होते.
 
त्यांना मानाचा पुलित्झर पुरस्कार सुद्धा मिळाला होता.
 
रॉयटर्सची प्रतिक्रिया
रॉयटर्स वृत्तसंस्थेचे अध्यक्ष मायकल फ्रिडनबर्ग आणि मुख्य संपादक अॅलेसँड्रा गल्लोनी यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आमचे छायाचित्रकार दानिश सिद्दीकी हे अफगाणिस्तानमध्ये मारले गेल्याचं समजल्यानं आम्ही अत्यंत दुःखात आहेत.
 
शुक्रवारी सकाळी हल्ला झाला त्यावेळी दानिश कंदहार प्रांतामध्ये अफगाणिस्तानच्या विशेष लष्करी तुकडी बरोबर होते. आम्ही याबाबत अधिक माहिती मिळवत आहोत. या भागातील प्रशासकीय यंत्रणांबरोबर आम्ही संपर्कात होत. दानिश यांच्या कुटुंब आणि सहकाऱ्यांना मदत करण्याचाही आम्ही प्रयत्न करत आहोत. दानिश हे प्रसिद्ध असा पुलित्झर पुरस्कारप्राप्त आणि अत्यंत हुशार पत्रकार होते. त्याचबरोबर ते उत्तम पती, पिता आणि सहकाऱ्यांमध्ये आवडते होते. या अत्यंत दुर्दैवी काळात त्यांच्या कुटुंबाबरोबर आमच्या संवेदना आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती