दानिश सिद्दिकी यांचा अफगाणिस्तानमध्ये रिपोर्टिंग करताना मृत्यू

शुक्रवार, 16 जुलै 2021 (13:58 IST)
प्रसिद्ध भारतीय फोटोजर्नलिस्ट दानिश सिद्दिकी यांचा अफगाणिस्तानमध्ये रिपोर्टिंग (बातमीदारी) करताना कंधाहारमध्ये मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानचे भारतातले राजदूत फरीद मामुन्दजई यांनी त्यांच्या मृत्यूचं वृत्त ट्विट करून दिलं आहे.
 
रॉयटर्स या वृत्तसंस्थेसाठी ते काम करत होते. अफगाणिस्तानात बातमीदारी करताना त्यांचा मृत्यू झाला आहे. दानिश यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत टिपलेल्या अंत्यसंस्कारांच्या फोटोंची खूप चर्चा झाली होती.
 
2020 मध्ये राजधानी नवी दिल्लीत झालेल्या दंगलीत त्यांनी काढलेले फोटोसुद्धा चर्चेचे विषय ठरले होते. त्यांना मानाचा पुलित्झर पुरस्कार सुद्धा मिळाला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती