यशपाल शर्माने आपल्या कारकीर्दीत 37 कसोटी आणि 42 एकदिवसीय सामने खेळले. कसोटीत त्याच्या नावावर 1606 धावा आहेत, तर एकदिवसीय सामन्यात 883 धावा बनल्या आहेत. यशपालने कसोटी क्रिकेटमध्ये 2 शतके आणि 9 अर्धशतके ठोकण्याचा विक्रम केला आहे. त्याचवेळी या माजी भारतीय खेळाडूने वन डेमध्ये 4 अर्धशतकेही खेळली होती. 1983 च्या विश्वचषकात यशपाल शर्माने भारताला विश्वविजेते बनवण्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावली होती. विशेषतः सेमी-फाईलमधील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने केलेला डाव कायमस्मरणीय आहे. यशपाल जीने उपांत्य सामन्यात 61 धावांचे महत्त्वपूर्ण खेळी खेळल्यामुळे भारताला अंतिम फेरी गाठणे सोपे झाले.