सौदीने कोरोनामुळे पवित्र स्थळांची यात्रा केली स्थगित

शनिवार, 29 फेब्रुवारी 2020 (14:27 IST)
कोरोना विषाणूंच्या (coronavirus impact) प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेऊन सौदी अरेबियाने सर्वात पवित्र स्थळांची यात्रा स्थगित केली आहे. मध्य आशियात २४५ जणांना संसर्ग झाल्याचे आढळल्याने वार्षिक हज यात्रेच्या काही महिने आधी हा निर्णय घेण्यात आला. पवित्र शहर मक्का आणि काबा येथे जाण्यापासून विदेशी नागरिकांना रोखणे, हा यामागचा उद्देश आहे.
 
या पवित्र ठिकाणी जगभरातून १ अब्ज ८० कोटी मुस्लिम भाविक येत असतात. मदिना येथील यात्राही स्थगित असेल. सौदी अरेबियाच्या विदेश मंत्रालयाने या निर्णयाची घोषणा करताना सांगितले की, या विषाणूंचा प्रसार रोखण्याच्या उपायातहत सर्व आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार सौदी अरेबिया सहकार्य करील. 
 
कोरोना विषाणूग्रस्त देशांना भेट देण्याआधी सौदी अरेबियाच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहनही करण्यात आले आहे. कोरोना विषाणूग्रस्त (coronavirus impact) देशांतून पर्यटक व्हिसावर सौदीला येणाऱ्या लोकांनाही प्रवेश दिला जाणार नाही.मध्य आशियाच्या केंद्रस्थानी असलेल्या इराणमध्ये कोरोना विषाणूंचा २४५ जणांना संसर्ग झाल्याचे रुग्ण आढळले असून यापैकी २६ जणांचा मृत्यू झाला आहे. तेलसमृद्ध कुवैतमध्ये संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. ही संख्या २६ वरून ४३ झाली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती