आपण आपल्या आजूबाजूला चोरीच्या अनेक घटना ऐकल्या आणि पाहिल्या असतील. पण आज चोरीच्या अशाच एका घटने ची माहिती मिळाली आहे , ज्याने हे ऐकले त्याला धक्काच बसला. चोरीची ही अनोखी घटना समोर आल्यानंतर तेथील सरकार आणि तेथील पोलीस प्रशासनही चक्रावून गेले आहे.
ही घटना अमेरिकेतील ओहायो शहरात घडली, जिथे निर्भय चोरट्यांनी छोटी वस्तू किंवा पैसे नाही तर संपूर्ण पूल चोरून नेला. या अनोख्या चोरीची माहिती ज्यांनी ऐकली त्याचा आपल्या कानांवर विश्वास बसेना. खरे तर चोर जेव्हा चोरी करायला येतात तेव्हा कोणाच्याही नजरेत न येता ते सोबत घेऊन जाऊ शकतील अशा वस्तू चोरतात. म्हणूनच बहुतेक चोर पैसे, दागिने किंवा कोणतीही छोटी वस्तू चोरण्याचा प्रयत्न करतात.
मात्र, अमेरिकेतील ओहायो शहरात चोरट्यांनी 58 फूट लांबीचा पूल चोरून एकप्रकारे पोलिसांना खुले आव्हानच दिले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांनी 58 फूट लांबीचा पूल चोरून नेला आणि त्याची कोणाला ही माहिती नाही. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस विभागातील अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी आजपर्यंत अशी चोरी पाहिली नाही, ज्यामध्ये चोरट्यांनी संपूर्ण पुल चोरी करून नेला.
पूर्व अक्रोन येथील एका नाल्याच्या पुलाची चोरट्यांनी चोरी केली. नाल्याच्या पलीकडे जाण्यासाठी लोक या पुलाचा वापर करत असे. सध्या पुलाला तडे गेले होते, त्यामुळे तो दुरुस्तीसाठी बाहेर काढून वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आला होता. येथून चोरट्यांनी हा पूल चपरून नेला. या पुलासाठी 30 लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुलाची चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.