जखमी झालेले सर्व प्रवासी रत्नागिरीतील चिपळूण येथील संगमेश्वर परिसरातील रहिवासी आहेत.जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद प्रक्रिया सुरु आहे. मिनीबस चालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला रत्नागिरी येथे रेफर करण्यात आले आहे . इतर 2 जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत.