Pakistan: हिंदू मंदिराची पुन्हा तोडफोड, कराचीतील योगमातेच्या दरबारावर एका व्यक्तीने हातोडा चालवला

मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (16:30 IST)
पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा देवी-देवतांच्या मूर्ती तोडण्याचे प्रकरण समोर आले आहे. ताजी घटना कराचीच्या ईदगाह पोलीस स्टेशन परिसरातील नारायणपुरा येथील आहे, जिथे योग माता मंदिर (दुर्गा मंदिर) येथे सोमवारी संध्याकाळी एका व्यक्तीने मंदिरात स्थापित मूर्ती हातोड्याने फोडल्या. त्यानंतर स्थानिक लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे स्थानिक हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. अशांतता लक्षात घेता खबरदारी म्हणून पाकिस्तानी रेंजरही तैनात करण्यात आले आहेत.
 
हल्लेखोर संध्याकाळी 6 वाजता हातोड्याने मंदिरात घुसला आणि घाईघाईने देव-देवतांच्या मूर्ती तोडण्यास सुरुवात केली, असे सांगण्यात येत आहे. हे कृत्य पाहून लोकांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली.
 
पोलीस वाचवण्यात व्यस्त होते
माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत आरोपीला पोलीस ठाण्यात नेले. हिंदूंनी आरोप केला की, पोलीस आधी मंदिराची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु स्थानिकांनी या प्रकरणाबाबत पोलीस ठाण्याबाहेर तीव्र आंदोलन केल्यावर हल्लेखोराला नंतर अटक करण्यात आली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती