मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलने गाझामधील लष्करी कारवाई आणखी तीव्र केली आहे. इस्रायली सैन्य गाझामध्ये जोरदार बॉम्बहल्ला करत आहे. तसेच, सोमवारी गाझा पट्टीत इस्रायली हल्ल्यात किमान ५२ जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी ३१ जणांनी निवारा म्हणून वापरल्या जाणाऱ्या शाळेत आश्रय घेतला होता. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी या हल्ल्याची माहिती दिली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, लोक झोपलेले असताना शाळेवर हल्ला करण्यात आला, ज्यामुळे त्यांच्या सामानाला आग लागली. इस्रायली सैन्याने म्हटले आहे की त्यांनी शाळेतून त्यांच्या कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना लक्ष्य केले होते. स्थानिक आरोग्य मंत्रालयाच्या आपत्कालीन सेवेचे प्रमुख फहमी अवद यांनी सांगितले की, उत्तर गाझा येथील शाळेवर झालेल्या हल्ल्यात ५५ हून अधिक लोक जखमी झाले आहे.