फ्रेंडशिप डे ला कापला त्याने मैत्रिणीचा गळा

भाषा

सोमवार, 4 ऑगस्ट 2008 (11:12 IST)
आपल्या मित्र मैत्रींनी प्रती प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे फ्रेंडशिप डे. या दिवशी मित्र मैत्रिणी एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका घेतात. एकमेकांना आकर्षक भेटवस्तू दिल्या जातात.

परंतु यूनानच्या संतोरिनमध्ये एका मित्राने चक्क आपल्या मैत्रिणीची गळा कापून हत्या केल्याने खळबळ उडाली. आदल्या दिवशी एथांसिओस अर्वांतिस याचे त्याची मैत्रीण अदमांतियाशी कडाक्याचे भांडण झाले.

याचा राग मनात ठेवत व्यवसायाने आचारी असलेल्या अर्वांतिसने फ्रेंडशिप डे च्या दिवशी त्याच्या मैत्रिणीचा चक्क गळा चिरला. आधी त्याने तिच्या कुत्र्याची हत्या केली आणि नंतर तिलाही ठार केले. यानंतर पोलिसांनी त्याचा पाच तास पाठलाग केल्यावर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

वेबदुनिया वर वाचा