धुलेंडी शुभेच्छा मराठीत Dhulivandan Wishes in Marathi

Webdunia
शुक्रवार, 14 मार्च 2025 (09:28 IST)
‘लाल’ रंग तुमच्या गालांसाठी,
‘काळा’ रंग तुमच्या केसांसाठी,
‘निळा’ रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
‘पिवळा’ रंग तुमच्या हातांसाठी,
‘गुलाबी’ रंग तुमच्या होठांसाठी,
‘पांढरा’ रंग तुमच्या मनासाठी,
‘हिरवा’ रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
धुलिवंदनाच्या शुभेच्छा
 
भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद
अखंड उठु दे मनी रंग तरंग…
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळूया आज हे रंग…
धुलिवंदनाच्या शुभेच्छा
 
थंड रंगस्पर्श
मनी नवहर्ष
अखंड रंगबंध 
जगी सर्वधुंद…
धुलिवंदनाच्या शुभेच्छा
 
लई लई लई भारी
मस्तीची पिचकारी
जोडीला गुल्लाल रे
धुलिवंदनाच्या शुभेच्छा
 
रंग साठले मनी अंतरी 
उधळू त्यांना नभी चला 
आला आला रंगोत्सव हा आला …
तुम्हाला होळीच्या रंगीत शुभेच्छा 
 
प्रेम रंगाने भरा पिचकारी
आपुलकीचे सारे रंग उधळू द्या जगी
धुलिवंदनाच्या शुभेच्छा
 
आनंद होवो OverFlow
मौजमजा कधी न होवो Low
तुमची होळी साजरी होवो एकदम नंबर One
आणि तुम्ही संपूर्ण आयुष्य करा Lots Of Fun
धुलिवंदनाच्या शुभेच्छा
 
इंद्रधनुच्या रंगांसोबत तुम्हाला पाठवल्या आहेत शुभेच्छा
तुमच्यावर प्रेम, आनंद आणि उल्हासाचा होवो वर्षाव
धुलिवंदनाच्या शुभेच्छा
 
रंगात रंगुनी जाऊ,
सुखात चिंब न्हाऊ,
आयुष्यात राहू दे सर्व रंग,
धुलिवंदनाच्या शुभेच्छा
ALSO READ: Holi 2025 Wishes in Marathi होळीच्या हार्दिक शुभेच्छा

संबंधित माहिती

पुढील लेख