✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
मल्हारी मार्तंड विजय अध्याय अकरावा
Webdunia
बुधवार, 4 डिसेंबर 2024 (12:27 IST)
॥ श्री मार्तंड भैरवाय नम: ॥ आपुलें अपजय पाहोन ॥ मल्ल जाहला क्रोधायमान ॥ तों तितक्यांत खड्गदंष्ट् येवोन ॥ मल्लाप्रति बोलतसे ॥१॥
म्हणे तव कृपें कडोन ॥ शत्रूस आज मारीन ॥ विजय दळीं गाजवीन ॥ पराक्रम पाहें माझा ॥२॥
ऐसें बोलोनि दैत्य ॥ निघाला दळासमवेत ॥ पंचदक्ष घोडे दशलक्ष रथ ॥ वीस लक्ष गजसेना ॥३॥
दैत्य आला पाहोन ॥ सांबें आज्ञापिला षडानन ॥ चतुरंग सेना मेळवोन ॥ षडानन सिध्द जाहला ॥४॥
दैत्य म्हणे रे षण्मुखा ॥ तूं युध्दासि नव्हेसी निका ॥ लोणी खायेरे बालका ॥ निघोनि जाय ॥५॥
ऐसे शब्द ऐकोन ॥ षडानन क्रोधें करुन ॥ सोडिता झाला सहस्त्र बाण ॥ खड्गदंष्ट्र दैत्यावरी ॥६॥
सहस्त्र बाण सांवरोन ॥ दैत्यें सोडिले सहस्त्रावधी बाण ॥ तें पाहोनि षडानन ॥ शक्तीकडोनि वारिलें ॥७॥
गगनीं मयोर उडवोन ॥ गज वधिला षडाननें ॥ दैत्य होवोनि क्रोधायमान ॥ रथकुंडल विध्वंसिले ॥८॥
घालोनि बाणजाळ ॥ षडानन केला व्याकुळ ॥ कोपोनि पार्वती बाळ ॥ दिव्य शक्ति काढिली ॥९॥
शक्ति ओपिली षडाननें ॥ दैत्यें वारिली कटाक्षें कडोन ॥ परी नावरतां हृदयीं येवोन ॥ भेदितांचि प्राण गेला ॥१०॥
खड्गदंष्ट्र गतप्राण पाहोन ॥ पळो लागलें त्याचें सैन्य ॥ षण्मुखाची सेना धावोन ॥ दैत्यदळासी मारिलें ॥११॥
इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यांतील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥१२॥
श्रीमाणिकप्रभुकृतटीकायां खड्गदंष्ट्रवधनो नाम एकादशोऽध्याय गोड हा ॥११॥
ALSO READ:
मल्हारी मार्तंड विजय अध्याय बारावा
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
मल्हारी मार्तंड विजय अध्याय दहावा
मल्हारी मार्तंड विजय अध्याय नववा
श्री मल्हारी मार्तंड विजय अध्याय आठवा
मल्हारी मार्तंड विजय अध्याय सातवा
मल्हारी मार्तंड विजय अध्याय सहावा
सर्व पहा
नवीन
मुलीसाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे
द्वादश ज्योतिर्लिङ्ग स्मरणम् Dvadasha Jyotirlinga Smaranam
Shravan 2025 सर्वात मोठा श्रावण मेळा भारतातील या पाच ठिकाणी भरतो
आरती गुरुवारची
Brihaspati Stotram गुरुवारी बृहस्पति स्तोत्र वाचा, संतान संबंधी संकटांचा अंत होईल
सर्व पहा
नक्की वाचा
Hariyali Teej 2025 हरियाली तीज व्रत कधी? साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या
आतापासून १३८ दिवस या ३ राशींना शनीच्या वक्री हालचालीचा फायदा होणार
पावसाळ्यात तांदळाच्या पाण्यामुळे उजळती त्वचा मिळेल, असे वापरा
पावसाळ्यात वांगी का खाऊ नये,खाल्ल्यास काय होते?
मानेचे कुबड कमी करण्यासाठी हे योगासन करा
पुढील लेख
मल्हारी मार्तंड विजय अध्याय दहावा