मल्हारी मार्तंड विजय अध्याय नववा

बुधवार, 4 डिसेंबर 2024 (12:24 IST)
॥ श्री मार्तंड भैरवाय नम: ॥ शिवसेनेसि पाहून ॥ मल्लासि सांगाति जाऊन ॥ मल्ल म्हणे दूता लागून ॥ शिवासि सैन्य कोठोनि आलें ॥१॥
वाद्यनाद कानीं पडला ॥ मल्ल पहावयास्तव गोपूरीं चढला ॥ सेना पाहोनि घाबरला ॥ दळ सिध्द केलें आपलें ॥२॥
ऐरावत दिधले सुरार्दनासि ॥ विद्युच्छकटनिर्जर विध्वंसासी ॥ चतुर्दंतगज उद्मत्त मल्लासि ॥ चित्रांगा वाजी देवशल्यासीं गज ॥३॥
चतुरंग सैन्य इंद्रगोप वाजीस ॥ हिमवंत गज दिधले सोरभास ॥ खड्ग सुरेंद्र दर्पदळणास ॥ कर्पुर तिलका वाजी गज ॥४॥
सुरग्रास दैत्याप्रति ॥ जयमंगल नामाचा हत्ती ॥ आणि अश्व जेंवी चंद्रकांति ॥ हातीचा भाला दिधला ॥५॥
कस्तुरीकवच नामाचा गजक्रूर ॥ नंदनोद्यानदलन कुंजर ॥ नरविर्ध्वंसका दिधले सत्वर ॥ चंडकोपासि विजयध्वजरथ ॥६॥
सिंधुनाम दैत्याला ॥ भ्रमरवेष्टित मातंग दिधला ॥ गोमुख श्रेष्ठ रथीं चढला ॥ धूम्रवर्णासि रथनीलगिरीं गज ॥७॥
सुवर्णवर्ण जुंपिले अश्वास ॥ श्यामध्वजरथ शूर्पकर्णास ॥ गज घोडे शस्त्र आपुले दळास ॥ युध्दास्तव दिधले मल्लें ॥८॥
ज्वालामुख शूलजिव्हा सुरारि सुरमर्दन ॥ कराळ पावकाख्य शक्तिदंत भीमाख्य मुख भीषण ॥ देवमल्ल बुधांतक निर्जरारिं गजमुखरक्ताक्ष त्रिदशार्दन ॥ काळध्वंस कुंभनास सिंहनाद नरांतक ॥९॥
खररथ खररोम खरांघ्रीकेश खरानन ॥ सप्तबाहु नववक्तृ चतुर्भुज हलदंत क्रूरदृष्टि करभानन ॥ वक्रदंत खरनख खड्गकेश असिजिव्ह सुराशन ॥ कुंतजिव्ह कुर्मकर्ण त्रिलोचन उदग्नासिं दुर्मुख ॥१०॥
चामरश्मश्रुरुत्रत वज्रांध्निदुर्धंर दुष्ट शूलरोम विनाशक ॥ त्रिनास सप्तरसन त्रिशीर चतु:शीर विद्युत्केश ज्वलदंष्ट्‍ व्याधमुख ॥ सुदुर्मतीं दुर्मुख रासभाकार बृहद्‍ जटा तडित्कर्ण क्रोधमुख ॥ पाशकर्ण प्रमोदन सिंहनाद खरनाद ॥११॥
अश्ववेश शुंडहस्त कोशबाहु तडीद्वक्ष त्रिपादवली नीलानन ॥ तिमीरांगार त्रिकर्ण चंडविक्रम श्वेतोदर शताक्ष धूम्राक्षवीर स्वांदन ॥ सुग्रीव शृंखलाहस्त शूलग्रीव सिंहासन ॥ क्रोधमूर्ति नभोमूर्ति महामूर्ति मदोत्कट ॥१२॥
सहस्त्राक्ष महारथांत ॥ मल्ल बैसला शस्त्रास्त्रांसहित ॥ गजारुढ होवोनियां दैत्य ॥ सैन्य घेवोनि निघाला ॥१३॥
कोल्हाळ वाद्यांचा गजर ॥ दणाणिलें त्रैलोक्यसमग्र ॥ दैत्य वीर अपार ॥ युध्दास्तव निघाले ॥१४॥
इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांड पुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यांतील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥१५॥
श्रीमाणिकप्रभुकृतटीकायां मल्लसैन्यनिर्गमननाम नवमोऽध्याय गोड हा ॥९॥
ALSO READ: मल्हारी मार्तंड विजय अध्याय दहावा

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती