शिलिं प्रतिबिंब पाहोन ॥ किर भिडे तथा लागोन ॥ अनेक परीचे सुमन ॥ घवघवीत आमोद ॥२॥
मंदावर श्वेत करवीरा ॥ जाईजुई बट मोगरा ॥ बकुल चंपक कर्पुरा ॥ कर्दळी प्रसवती ॥३॥
चंद्रकांति सुरेख ॥ हिरे रत्न माणिक ॥ प्रतिबिंब पाहोनि शुक्र ॥ फळें म्हणोनि चोंच मारी ॥५॥
कल्पद्रुमाचे तळीं ॥ सम विषम खेळति सिध्द बाळी ॥ सिंहाचीं नखें उमटलीं स्थळीं ॥ घेऊं जातां किरात ठके ॥६॥
बागवेली फणस केळ ॥ रत्नालू कमरक तुतें नारळ ॥ कोहाळवेल सदाफळ ॥ रत्नाकृति झळकति ॥८॥
परोपरीचे झाड ॥ अनेक प्रकार फलगोड ॥ वृक्षीं बैसोनि पक्षी जोड ॥ एकमेकां शब्द करिती ॥९॥
आनंदे मयूर नाचती ॥ कोकिळा सुस्वरें बोलती ॥ अनेक परीचे पक्षी जाती ॥ वृक्षशाखीं बैसले ॥१०॥
ऐसें वन शोभायुक्त ॥ द्विज चालिले पहात पहात ॥ ते चंद्रचूडा सभा अकस्मात ॥ देखते जाहले ॥११॥