मल्हारी मार्तंड विजय अध्याय पहिला
 
	
		
			 
										    		बुधवार,  4 डिसेंबर 2024 (12:13 IST)
	    		     
	 
 
				
											श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीमार्तंडभैरवाय नम: ॥ प्रार्थना जी हे वक्रतुंडा ॥ वेलाकृति सरळ शुंडा ॥ वदेन माहात्म्य मार्तंडा ॥ कृपा करुनि वदवा जी ॥१॥
	कैलास मेरुचे शिखरीं ॥ पार्वती शिवासी प्रश्न करी ॥ म्हणे स्वामी पृथ्वीवरी ॥ पुनित तीर्थ कोणतें ॥२॥
	आणि अवतार कोणते ॥ संकट पडल्या निवारिते ॥ तें सांगा जी मातें ॥ म्हणोनि चरणी ठेवी माथा ॥३॥
	शिव म्हणे पार्वतीसी ॥ सनत्कुमार सांगे ऋषीसी ॥ तें मी सांगेन तुजसी ॥ खंजरीट नयने ॥४॥
	मागें मणिचूल पर्वतीं ॥ धर्मपुत्र होते साती ॥ पत्निसहित कर्म करिती ॥ यज्ञयागादिक ॥५॥
	निवैरपणें पाही ॥ मृग व्याघ्र एक्याठायीं ॥ नकुळ आणि अहि ॥ स्वछंडे वर्तती ॥६॥
	आंबे आणि केळें ॥ अनेक सदा फळति फळें ॥ मयुर कुकति वेळोवेळीं ॥ वृक्ष छाये बैसोनियां ॥७॥
	तया ठायीं मल्लदैत्य ॥ आला परिवारें सहित ॥ मुखीं ज्वाळा केवळ कृतांत ॥ भयानकरुप तें ॥८॥
	हाताचे केशें कडोन ॥ वृक्ष पडति तुटोन ॥ हत्तिं घोडे रथ मिळोन ॥ वन समग्र नासिलें ॥९॥
	वीर अनेक परीचे ॥ लेइले वज्र कवचे ॥ नांगरासारिखे ताडिलें ॥ शेंडी उपटोनी हांसती ॥११॥
	गार्हपत्त्यांत विष्टा केले ॥ वेदींत मद्य प्याले ॥ आश्रमातें नासिलें ॥ दुष्टजनीं ॥१२॥
	कंठासि दोर बांधून ॥ बुडविती कूपीं नेऊन ॥ बहुत प्रकारें पीडोन ॥ दुष्ट मल्ल निघोन गेले ॥१३॥
	ऋषि मनीं विचार करिती ॥ काय जाहली दैव गती ॥ सांगावें कवणा प्रति ॥ दु:ख हें ॥१४॥
	शाप द्यावे दुर्जनांसि ॥ तरि हानि होईल तपासी ॥ साह्य होईल आम्हासी ॥ कोण आतां ॥१५॥
	इंद्रासि शरण जावें ॥ कीं ब्रह्मा विष्णु महादेवे ॥ कीं स्थल सोडोनि जावें ॥ आणीक ठायीं ॥१६॥
	इति श्रीक्षेत्रखंड ब्रह्मांडपुराण ॥ मल्लारिमाहात्म्य व्यास कथन ॥ त्यांतील सारांश प्राकृत भाषण ॥ माणिकदास बोलिला असे ॥
	श्रीमाणिकप्रभुकृतटीकायां आश्रमपीवर्णनोनाम प्रथमोऽध्याय गोड हा ॥१॥
	