Magh Purnima 2021 : माघ पौर्णिमा तिथी, मुहूर्त, पूजा नियम

मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (13:07 IST)
हिंदू धर्मात माघ पौर्णिमेचं विशेष महत्त्व आहे. माघ पौर्णिमेला महा माघी आणि माघी पौर्णिमा या नावाने देखील ओळखलं जातं. यादिवशी चंद्र पूजेचं महत्त्व आहे. पौर्णिमेला दान, पुण्य आणि स्नान शुभ फल देणारे असल्याचे सांगितले जातं. या वर्षी माघ पौर्णिमा 27 फेब्रुवारी 2021 रोजी आहे.
 
माघ पौर्णिमा 2021 तिथी आणि शुभ मुहू्र्त-
 
पौर्णिमा तिथी आरंभ- 15:50- 26 फेब्रुवारी 2021
पौर्णिमा तिथी समाप्त- 13:45- 27 फेब्रुवारी 2021
 
माघ पौर्णिमा महत्व-
 
माघ पौर्णिमेच्या पूर्व संध्याकाळी पवित्र नदीत स्नान करणे शुभ मानले गेले आहे. या दिवशी दान-पुण्य केल्याने पापांपासून मुक्ती मिळते. माघ पौर्णिमेला प्रभू विष्णू आणि  हनुमानाची पूजा केली जाते. या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असेही म्हटले जाते.
 
माघ पौर्णिमा व्रत नियम-
 
या दिवशी पवित्र नदीत स्नान करावे.
नंतर व्रत नियमांचे पालन करुन विष्णू मंदिरात किंवा घरीच पूजा करावी.
या दिवशी सत्यनारायणाची पूजा करुन कथा करण्याचे खूप महत्त्व आहे.
नंतर ’या ओम नमो नारायण’ मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा.
गरीब आणि गरजूंना मदत करावी, वस्त्र-अन्न दान करावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती