जया एकादशीला कोणत्या वस्तूंचे सेवन टाळावे

शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (17:10 IST)
माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला जया एकादशी व्रत ठेवण्याची पद्धत आहे. यंदा ही तिथि 23 फेब्रुवारी आहे. पौराणिक माहितीनुसार या दिवशी व्रत-पूजन 
 
केल्याने भूत ‍पिशाच योनीची भीति नाहीशी होते. एकादशी महात्म्या स्वयं श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिर यांना सांगितले होते.
 
जया एकादशी व्रत शुभ मुहूर्त-
 
एकादशी तिथिी आरंभ- 22 फेब्रुवारी 2021 वार सोमवार संध्याकाळी 05 वाजून 16 मिनिटापासून
एकादशी तिथी समाप्त- 23 फेब्रुवारी 2021 वार मंगळवार संध्याकाळी 06 वाजून 05 मिनिटापर्यंत
जया एकादशी पारणा शुभ मुहूर्त- 24 फेब्रुवारी सकाळी 06 वाजून 51 मिनिटापासून ते सकाळी 09 वाजून 09 मिनिटापर्यंत
पारणा अवधी- 2 तास 17 मिनिटे

जया एकादशीला कोणत्या वस्तूंचे सेवन टाळावे
जया एकादशी व्रत करणार्‍यांनी दशमी तिथीला रात्री मसूराची डाळ खाणे टाळावे.
या दिवशी चणे आणि चण्यांनी बनलेले पदार्थ खाऊ नये.
मध खाणे टाळावे.
ब्रह्मचर्याचे पालन करावे.
या पूजेत विष्णूंना धूप, फळ, फुल, दीप, पंचामृत अर्पित करावे.
व्रत करताना कोणाप्रती द्वेष नसावा.
क्रोधित मनाने व्रत करु नये. मन शांत असावं.
दुसर्‍यांची निंदा करु नये, चुगली करु नये.
या उपवासात अन्न ग्रहण करणे वर्ज्य आहे.
व्रत न करणार्‍यांनी देखील तांदूळ खाणे टाळावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती