गुरु पौर्णिमेला या प्रकारे करा समर्थ रामदास स्वामी यांची पूजा
बुधवार, 9 जुलै 2025 (06:48 IST)
आषाढातील शुक्ल पक्ष पोर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. तसेच हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. प्रत्येक जण हा आपल्या गुरुप्रती निष्ठावान असतो. व गुरूपौर्णिमा दिवशी मनोभावे गुरूंची पूजा करावी. म्हणजे गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहतो. गुरुपौर्णिमेला समर्थ रामदास स्वामी यांची पूजा कशी करावी जाणून घ्या.
समर्थ रामदास स्वामींची पूजा ही त्यांच्या भक्तांमध्ये अत्यंत श्रद्धेने केली जाते. समर्थ रामदास स्वामी हे श्रीराम आणि हनुमान यांचे परम भक्त होते, त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये श्रीरामतारक मंत्र, हनुमान चालिसा, आणि समर्थांनी रचलेल्या आरत्या व स्तोत्रांचा समावेश होतो. तसेच सर्वात आधी पूजा स्थळ तयार करावे. पूजेसाठी स्वच्छ आणि पवित्र स्थान निवडा. समर्थ रामदास स्वामींची मूर्ती किं वा चित्र ठेवा. त्यासोबत श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्ती/चित्रांचाही समावेश करू शकता.
हळद, कुंकू, गंध, फुले, तुळशीपत्र, नैवेद्य (प्रसाद) आणि दीप तयार ठेवा.
संकल्प
पूजा सुरू करण्यापूर्वी हात धुऊन, आचमन करून संकल्प घ्या. तसेच समर्थ रामदास स्वामींचे ध्यान करा. त्यांचे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांनी युक्त रूप डोळ्यासमोर आणा. यानंतर मंत्र: "ॐ नमो भगवते रामदासाय" किंवा "जय जय रघुवीर समर्थ" यांचे उच्चारण करून आवाहन करा.
पादुका पूजन :
समर्थांच्या मूर्तीला किंवा पादुकांना पंचामृत किंवा स्वच्छ जलाने अभिषेक करा.
चंदन, हळद-कुंकू लावून फुलांचा हार अर्पण करा.
स्तोत्र आणि आरती पठण:
समर्थांनी रचलेली स्तोत्रे आणि आरत्या म्हणाव्यात, जसे की, श्रीराम तारक मंत्र: "श्रीराम तारक मंत्र जप"
हनुमान चालिसा-समर्थ हनुमानाचे भक्त होते, त्यामुळे हनुमान चालिसा पठण करावे.
आरत्या: शंकराची आरती, गणपतीची आरती, किंवा विठ्ठलाची आरती.
मनाचे श्लोक: समर्थांनी रचलेले "मनाचे श्लोक" पठण करावे, जे मन शुद्ध आणि शांत करते.
"दासबोध" मधील काही ओव्या किं वा समर्थांचे अभंग पठण करू शकता.
नैवेद्य अर्पण:
नैवेद्य म्हणून सात्त्विक पदार्थ (जसे, खीर, फळे, साखरेचा प्रसाद) अर्पण करा.