पिशाच योनीतून मुक्ती देणारं जया एकादशी व्रत, कथा वाचा

मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (08:50 IST)
जया एकादशी संदर्भात प्रचलित कथेनुसार धर्मराज युद्धिष्ठिर द्वारे प्रश्न विचारल्यावर श्रीकृष्णाने माघ मासातील शुक्ल पक्ष एकादशीचे वर्णन केले आहे. या कथेनुसार प्राचीन काळात देवराज इंद्राचे स्वर्गात राज्य होते आणि इतर सर्व देवगण स्वर्गात सुखपूर्वक राहते होते. एकदा नंदन वनात उत्सव सुरु असताना इंद्र आपल्या इच्छेनुसार अप्सरांसह विहार करत होते. या दरम्यान गंधर्वोंमध्ये प्रसिद्ध पुष्पदंत आणि त्यांची कन्या पुष्पवती, चित्रसेन आणि स्त्री मालिनी देखील उपस्थित होते.
 
सोबतच मालिनी पुत्र पुष्पवान आणि त्यांचा पुत्र माल्यवान देखील उपस्थित होते. त्यावेळी गंधर्व गायन करत होते आणि गंधर्व कन्या नृत्य प्रस्तुत करत होत्या. सभेत पुष्पवती नामक गंधर्व कन्या नृत्य करत असताना तिची नजर माल्यवानवर पडली आणि ती मोहित झाली. मोहित होऊन ती माल्यवानवर काम-बाण चालवू लागली.
 
पुष्पवती सभेची मर्यादा विसरुन या प्रकारे नृत्य करु लागली की माल्यवान तिच्याकडे आकर्षित होऊ लागला. माल्यवान गंधर्व कन्येची भाव-भंगिमा बघून सुध बुध गमावून बसला आणि त्याच्या गायनाची वेळ आली तेव्हा त्याचे चित्त थार्‍यावर नसल्यामुळे सुर -तालाची साथ सुटली. यावर इंद्र देवाने क्रोधित होऊन दोघांना श्राप दिला. इंद्राने म्हटले की आता तुम्ही मृत्यू लोकात पिशाच रुप धारण कराल आणि आपल्या कर्माची फळ भोगाल.
 
श्रापामुळे तत्काळ दोघे पिशाच बनले आणि हिमालय पर्वतावर एका वृक्षावर दोघे निवास करु लागले. येथे पिशाच योनी राहून त्यांना अत्यंत कष्ट भोगावे लागले. त्यांना गंध, रस, स्पर्श इतर कसलेच भान नव्हते. ते अत्यंत दुखी होते. एक क्षण देखील निद्रा त्याच्य नशिबी येत नसे. एकेदिवशी पिशाचाने आपल्या स्त्रीला विचारले की आम्ही कोणते असे पाप केले होते ज्या या योनित जन्माला यावे लागले. या योनित राहण्यापेक्षा नरकाचे दुख भोगणे उत्तम आहे. म्हणून आता तरी आमच्याकडून कुठलंही पाप घडू नये असा विचार करत ते दिवस घालवत होते.
 
देवयोगाने तेव्हाच माघ मास शुक्ल पक्षाची जया नामक एकादशी आली. त्या दिवशी दोघांनी केवळ फलाहारावर राहून दिवस व्यतीत केला आणि संध्याकाळी दु:खी मनाने पिंपाळच्या वृक्षाखाली बसून गेले. तिथे मृत देहासमान ते पडले होते. रात्र सरली आणि आणि अज्ञातपणे जया एकादशी व्रत झाल्यामुळे दुसार्‍यादिवशी दोघांना पिशाच योनीहून मुक्ती मिळाली.
 
आता माल्यवान आणि पुष्यवती पूर्वीपासून अधिक सुंदर झाले आणि त्यांना पुन्हा स्वर्ग लोकात स्थान मिळाले.
 
श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिर यांना सांगितले की जया एकादशी व्रत केल्यामुळे वाईट योनीहून मुक्ती मिळते. एकादशी करणार्‍या श्रद्धालुला सर्व यज्ञ, जप, दानाचे महत्त्व मिळून जातं. जया एकादशी व्रत करणार्‍यांना हजारो वर्षांपर्यंत स्वर्गात वास करता येतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती