गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला “हरतालिका` असे म्हणतात. या दिवशी स्त्रिया महादेव आणि पार्वतीची पूजा करून अखंड सौभाग्याची प्रार्थना करतात. सुवासिनींसह विवाह योग्य मुली योग्य वर प्राप्तीसाठी हे व्रत अगदी भक्तीभावाने करतात. म्हणूनच याचे काही खास नियम आम्ही आपल्याला सांगत आहोत ते व्रत करणार्यांनी जाणून घेणे आवश्यक आहे-
उपवासाच्या दिवशी पतीशी भांडणही करू नये. शक्य असल्यास, विवादांच्या गोष्टींना जास्त महत्त्व देऊ नका आणि गोष्टींकडे दुर्लक्ष करा. नंतर, एकत्र बसून प्रेमाने गोष्टींचा सुरळीत कराव्या.