Ganesha Chaturthi 2021 : गणपती स्थापना शुभ मुहूर्त, सोपी विधी आणि नियम

रविवार, 5 सप्टेंबर 2021 (13:47 IST)
भाद्रपद महिन्यातील गणेश चुतर्थीला घरोघरी पार्थिव गणपतीचे पूजन केले जाते. या दिवशी प्रत्येक घरात मातीपासून बनवलेल्या गणेशाची स्थापना केली जाते. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार, यावेळी गणेशोत्सव 10 सप्टेंबर 2021 पासून सुरू होत आहे आणि विसर्जन अनंत चतुर्दशी म्हणजेच 19 सप्टेंबर रोजी होईल. गणेश मूर्तीची स्थापना आणि विसर्जन करण्याची ती सोपी पद्धत जाणून घेऊया.
 
गणेश चतुर्थी शुभ मुहूर्त
हिंदू मान्यतेनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर पूजेचे विशेष महत्त्व असून यावेळी गणेश चतुर्थी 10 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी दुपारी 12:17 वाजता शुभ मुहूर्त सुरू होईल आणि रात्री 10 पर्यंत राहील. 
 
या प्रकारे करा गणपतीची स्थापना
 
1. जर गणेशाला प्रसन्न करायचा असेल तर श्रीगणेशाने आनंदाने आणि विधिवत घरात प्रवेश करावावा. गणेशाच्या आगमनापूर्वी घर आणि दरवाजा सजवावे आणि ते जिथे गणपतीची स्थापना करायची असेल ती जागा स्वच्छ करून पूजेसाठी तयार करावी.
 
2. गणपती आणण्यासाठी जाण्यापूर्वी नवीन वस्त्र धारण करावे, डोक्यावर टोपी किंवा साफा घालावा. पितळ किंवा चांदीचं ताम्हण सोबत न्यावं. लाकडी पाट देखील सोबत घेऊन जाऊ शकता. त्यावर गणेशाची मूर्ती विराजित करुन घरात प्रवेश करावं. सोबत घंटा किंवा इतर वाद्य यंत्र घेऊन जावे. बाजारात गणपती घेताना मोलभाव करु नये. त्यांना आमंत्रित करुन दक्षिणा द्यावी. नंतर गणपतीची मूर्ती वाजत-गाजत आणावी आणि घरात प्रवेश करण्यापूर्वी दारावर आरती ओवाळावी. मंगल गीत तसंच मंत्रांचे उच्चारण करावे.
 
3. यानंतर गणपतीची मूर्ती स्थापित करण्यापूर्वी ईशान कोपरा स्वच्छ करुन कुंकुाने स्वस्तिक तयार करावे आणि हळदीने चार ठिपके काढावे. नंतर अक्षता ठेवून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावे. त्यावर लाल, पिवळा, किंवा केशरी रंगाचं आसान घालावं. त्याला चारी बाजूने फुलं आणि आंब्याच्या पानांनी सजवावं आणि पाटासमोर रांगोळी काढावी. तांब्याच्या कळशात पाणी भरुन त्यावर नारळ ठेवावं.
 
4. जवळपास सुवासिक उदबत्ती, आरतीची थाळ, आरती पुस्तक, प्रसाद सर्व वस्तूं ठेवून घ्यावं. आता कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन ॐ गंगणपते नम: चा उच्चारण करत मूर्तीला पाटावर विराजित करावं. आता विधीपूर्वक पूजा करुन आरती करावी आणि प्रसाद वितरित करावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती