गणपतीची मनोभावे पूजा आणि प्रार्थना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दु:ख आणि संकट नाहीसे होतात. कोणत्याही संकटातून निघण्यासाठी गौरीपुत्र गणेशाची पूजा केली जाते. गणपतीची सात्त्विक साधना अत्यंत सोपी आणि प्रभावशाली असल्याचे सांगितले जाते. आज आम्ही असे 3 मंत्र सांगत आहोत ज्यांचे जप केल्याने जीवनात सुख-समृद्धी नांदते.
तांत्रिक गणेश मंत्र:
ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरू गणेश।
ग्लौम गणपति, ऋदि्ध पति, सिदि्ध पति। मेरे कर दूर क्लेश।।
दररोज सकाळी महादेव, पार्वती आणि गणपतीची पूजा केल्यानंतर या मंत्राचा 108 वेळा जप करावा. याने सर्व दु:ख नाहीसे होतात. परंतू या मंत्राचा जप करताना पूर्ण सात्त्विकता राखावी. सोबतच क्रोध, मांस, मदिरा, परस्त्री यापासून दूर राहावे.
गणेश कुबेर मंत्र:
ॐ नमो गणपतये कुबेर येकद्रिको फट् स्वाहा।
एखाद्याला खूप कर्ज झाले असल्यास किंवा आर्थिक समस्या वाढल्या असल्यास या मंत्राचे जप करावे. हे मंत्र नियमित जपल्याने ऋण फेडलं जातं. धन आगमनाचे नवीन स्रोत देखील तयार होतात.