श्री गणेशाचे त्वरित फळ देणारे असे 8 प्रभावी मंत्र जाणून घेऊ या...

शनिवार, 9 जानेवारी 2021 (15:09 IST)
श्री गणेशाचे चमत्कारिक आणि तात्काळ प्रभावी फळ देणारे असे 8 मंत्र, चला जाणून घेऊ या -
 
1 गणपतीचे बीजमंत्र 'गं' आहे.

2 'ॐ गं गाणपत्ये नमः या मंत्राचा जपा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

3 षडाक्षरी मंत्राचा जपा आर्थिक प्रगती आणि समृद्धी देणारे आहे.
- ॐ वक्रतुंडाय हुम्‌
एखाद्याकडून कोणासाठी केलेली वाईट क्रियेचा नायनाट करण्यासाठी, विविध मनोकामना पूर्ण करण्यासाठी उच्छिष्ट गणपतीची उपासना करावी. याचा जपा करताना तोंडात गूळ, लवंग, वेलची, बत्ताशा, तांबूळ, सुपारी ठेवावी. ही उपासना अक्षय भांडार देणारी असते. यामध्ये पवित्र-अपवित्रेचे काही विशेष बंधन नसते.

4 उच्छिष्ट गणपतीचे मंत्र –
- ॐ हस्ती पिशाच्ची लिखे स्वाहा.

5 आळस, नैराश्य, कलह,विघ्न दूर करण्यासाठी विघ्नराजाच्या रुपेच्या उपासनेसाठी या मंत्राचा जपा करावा.-
- गं क्षिप्रप्रसादनाय नम:

6 सर्व विघ्न दूर करून संपत्ती आणि आत्मविश्वासाच्या प्राप्तीसाठी हेरंब गणपतीच्या मंत्राचा जपा करावा. -
'ॐ गं नमः'

7 उपजीविका प्राप्ती आणि आर्थिक वाढी साठी लक्ष्मी विनायक मंत्राचा जपा करावा.
- ॐ श्री गं सौभ्याय गाणपत्ये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा.

8 विवाहात येणारा अडथळ्यांना दूर करणाऱ्यांना त्रैलोक्य मोहन गणेश मंत्राचा जपा केल्याने शीघ्र लग्न होतो आणि अनुरूप जोडीदार मिळतो.
- ॐ वक्रतुण्डैक दंष्ट्राय क्लीं ह्रीं श्री गं गणपते वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा.
या मंत्राच्या व्यतिरिक्त गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशन गणेश स्तोत्र, गणेशकवच, संतानं गणपती स्तोत्र, ऋणहर्ता गणपती स्तोत्र, मयूरेश स्तोत्र, गणेश चालीसाचे पठण केल्याने श्री गणेशाचे आशीर्वाद प्राप्त होतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती