Hartalika Teej 2021: हरतालिका तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (12:38 IST)
हिंदू धर्मात भाद्रपद महिन्यात महत्तवाचं व्रत म्हणजे हरतालिका. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरतालिका व्रत केलं जातं. असे मानले जाते की स्त्रिया अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हा उपवास करतात. हा उपवास सर्व उपवासामध्ये सर्वात कठीण परंतु श्रेष्ठ मानला गेला आहे. या दिवशी कडक उपोषण करुन पाणीही पिऊ नये अशी रुढी आहे. या दिवशी मुली व सुवासिनी शिवलिंगे स्थापित करुन भक्तिपूर्वक पूजा करतात. अविवाहित मुली योग्य वर मिळवण्यासाठी हरतालिका व्रत ठेवतात. हरतालिका व्रताची तारीख, शुभ वेळ आणि उपासना पद्धत जाणून घ्या-
हरतालिका कधी आहे
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची तृतीया तिथी 8 सप्टेंबर, बुधवारी रात्री 2:33 वाजता उशिरा रात्री सुरू होईल. ही तारीख 09 सप्टेंबर रोजी दुपारी 12:18 वाजता संपेल. अशा स्थितीत हा उपवास 09 सप्टेंबर रोजी उदय तिथीला ठेवला जाईल.
हरतालिका शुभ मुहूर्त
हरतालिकेच्या पूजेसाठी दोन शुभ मुहूर्त येत आहेत. पहिला शुभ मुहूर्त सकाळी आणि दुसरा प्रदोष काल म्हणजे सूर्यास्तानंतर.
सकाळचा मुहूर्त -
हरतालिकेची पूजा करण्याची शुभ वेळ सकाळी 06.03 ते 08.33 पर्यंत आहे. तुम्हाला पूजेसाठी मिळणारा एकूण वेळ 02 तास 30 मिनिटे आहे.
प्रदोष काळ पूजा मुहूर्त -
पूजेची शुभ वेळ संध्याकाळी 06.33 ते 08.51 पर्यंत आहे.
हरतालिका महत्त्व-
हरतालिका व्रत केल्याने पतीला दीर्घायुष्य लाभतं. असे मानले जाते की हे व्रत केल्याने एखाद्याला योग्य वरही मिळतो. या उपवासाच्या प्रभावाने संतानसुखही मिळतं.
हरतालिका पूजा विधी -
या दिवशी वाळूने महादेवाची पिंडी, पार्वती आणि सखीची प्रतिमा तयार केली जाते.
हरतालिका पूजा करण्यापूर्वी गणपतीचे आव्हान केले जातात. विड्यांच्या पानावर खारीक, बदाम, शिक्का ठेवून सुपारीच्या रूपात गणपतीची स्थापना करून त्यांची विधीपूर्वक पूजा केली जाते.