उपवासाची पनीर-आलू टिक्की, टेस्टसोबतच एनर्जीही मिळेल

मंगळवार, 14 जून 2022 (11:28 IST)
सामग्री
बटाटा, पनीर, दही, रॉक सॉल्ट, साखर, काळी मिरी, देसी तूप, हिरवी मिरची, हिरवी कोथिंबीर, आले, मीठ
 
कृती
प्रथम बटाटे उकळून थंड पाण्यात टाका. त्यानंतर त्यांना सोलून मॅश करा. आता पनीर घालून मॅश करा. मीठ, काळी मिरी, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि किसलेले आले (पर्यायी) घालून चांगले मळून घ्या. त्यात एक चमचा कुट्टूचं पीठ घाला. आता गोल टिक्कीचा आकार द्या आणि पॅनवर तूप लावून कुरकुरीत शेलो फ्राय करुन घ्या. एका प्लेटमध्ये काढून दही, हिरव्या कोथिंबिरीची चटणी यासह सर्व्ह करा. ही टिक्की तुम्हाला ऊर्जा देईल तसेच चवही बदलेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती