साहित्य :-
गोड जातीची एक मोठ्ठ सफरचंद, लिंबाचा रस, आवडीप्रमाणे चिमूटभर दालचिनी पावडर, 1 टिस्पून बारीक केलेले अगर, 1 कप मिल्क पावडर, 1 टिस्पून साखर, 1 टिस्पून साजूक तूप.
कृती :-
एका पातेल्यात पाव कप पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस किंवा सायट्रीक अॅसिड आणि दालचिनी पूड एकत्र करा. सफरचंदाचा मधलाच गोलाकार भाग कापून वेगळा करा. मग ते वरील पाण्यातच किसा. आता हे मिश्रण शिजत ठेवा. सतत ढवळत रहा. करकरीत सफरचंदे असतील तर मिश्रण शिजायला वेळ लागेल. पिठूळ असतील तर लगेच शिजतील. शिजवून जॅम करायचा नाही. सगळे मिश्रण छान एकजीव झाले आणि पाणी आटले कि आच बंद करा. सफरचंदाच्या गोडीवर अवलंबून साखर वापरायची आहे कि नाही ते ठरवा.