Potato Kadhi बटाटा कढी

गुरूवार, 7 जुलै 2022 (07:54 IST)
साहित्य
- अर्धा किलो बटाटे उकडलेले आणि सोललेले
- 2 टीस्पून रॉक सॉल्ट
- 1/4 टीस्पून लाल तिखट
- अर्धा कप पाणी शेंगाडाचं पीठ
- अर्धा टीस्पून धणे पावडर
- तळण्यासाठी तेल
- अर्धा कप दही 
- 8-10 कढी पत्ता
- अर्धा चमचा जिरे\
- 2 संपूर्ण लाल मिरच्या
- 1 टेस्पून आले किसलेले
- 1 टीस्पून कोथिंबीर बारीक चिरून
- 4 कप पाणी
 
कृती
उपावसाची कढी बनवण्यासाठी आधी बटाटे, मीठ, लाल तिखट, शेंगाड्याचं पीठ मिक्स करून मिश्रण तयार करा आणि थोडे मिश्रण बाजूला ठेवा. यानंतर, कढईत तेल गरम करा, नंतर बटाटा आणि शेंगाड्याचं पीठ या मिश्रणातून भजे तयार करुन घ्या. आणि बाजूला ठेवा. आता एका भांड्यात दही आणि पाणी मिसळून मिश्रण तयार करा. यानंतर, एका मोठ्या भांड्यात तेल गरम करा, कढीपत्ता, जिरे आणि संपूर्ण लाल मिरच्या घालून ते फोडणी तयार करा. या नंतर, दही मिश्रण कढईत टाकून उकळी येईपर्यंत ढवळत राहा. उकळल्यानंतर कढीत मीठ घाला आणि आधी तयार केलेले भजी घाला आणि थोडा वेळ शिजवा. यानंतर, तयार उपवासाची कढई एका वाडग्यात काढून घ्या, ती हिरव्या कोथिंबीरने सजवा आणि पुरीबरोबर गरम गरम सर्व्ह करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती