या दिवशी शेतकरी आपल्या शेतीत साहाय्य करणार्या अवजारांची पूजा करतात.
विद्यार्थी आपल्या वह्या-पुस्तकांची पूजा करतात. कारण विद्यार्थी जीवनातील ही शस्त्रेच आहेत. तसेच या प्रत्येकात देव आहे. या दिवशी विद्यार्थ्यांनी वह्या, पुस्तके, लेखणी या सर्वांची पूजा करायला हवी. विद्यार्थी जीवनातील ही शस्त्रे सरस्वतीमातेचे प्रतीक आहेत. आपण आपल्या जीवनातील ज्ञानग्रहण करायला साहाय्य करणार्या सर्व शस्त्रांचे या दिवशी मनोभावे पूजन करावे.