दसरा 2020 : दशमी 26 ऑक्टोबरला तर दसरा 25 ऑक्टोबरला का ?

गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (10:48 IST)
दसरा हा वाईटावर चांगल्याची विजय मिळवण्याचे प्रतीक आहे. या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामाने लंकापती रावणाचा वध केला होता. प्रभू श्रीरामाचे रावणा वर विजयाच्या स्मरणार्थ हा दसऱ्याचा उत्सव साजरा केला जातो. या सणाला विजयादशमी असे ही म्हणतात. तसेच या दिवशी आई दुर्गाने महिषासुराचा वध केला.
 
* यंदाच्या वर्षी दसऱ्याचा सण 25 ऑक्टोबर 2020 रोजी साजरा केला जाणार आहे आणि मतांतराने 26 ऑक्टोबर रोजी देखील साजरा केला जाणार आहेत.
 
* या दिवशी सूर्य तूळ राशी मध्ये आणि चंद्रमा मकर राशी मध्ये असणार. या दिवशी धनिष्ठा नक्षत्र असणार. दिवाळीच्या 20 दिवसांपूर्वी दसरा सण साजरा केला जातो.
 
* यंदाच्या वर्षी 2020 मध्ये दशमी 26 ऑक्टोबर रोजी साजरी होणार आहे. परंतु दसरा तर 25 ऑक्टोबर रविवारी रोजी आहे. आता प्रश्न असा आहे की जर दशमी 26 ला आहे तर मग दसरा 25 ला साजरा का करावा.?
 
* या मागील कारण असे की दसरा सण अश्विन महिन्यातील शुक्लपक्षाच्या दशमी तिथीला अपरान्ह काळात म्हणजे दुपारी साजरा केला जातो.
 
* या काळाची अवधी सूर्योदयाच्या दहाव्या मुहूर्तापासून ते बाराव्या मुहूर्ता पर्यंत असते.
 
* जर दशमी दोन दिवसाच्या दुपारच्या कालावधीत असल्यास पहिल्या दिवशी दसरा साजरा केला जाणार. 
 
* जर दशमी दोन दिवसात येत असल्यास पण दुपारच्या कालावधीत नाही, अश्या परिस्थितीत देखील हा सण पहिल्याच दिवशी साजरा होणार.
 
* जर दशमी दोन दिवसाची असल्यास आणि दुसऱ्या दिवशीच दुपारची असल्यास तर दसरा दुसऱ्या दिवशी साजरा होणार.
 
* या व्यतिरिक्त श्रवण नक्षत्र देखील दसऱ्याच्या मुहूर्ताला प्रभावित करतो.
 
* जर दशमी दोन दिवसाची असल्यास(मग ती दुपारची असो किंवा नसो)पण, श्रवण नक्षत्र पहिल्या दिवशी दुपारच्या कालावधीत असल्यास दसऱ्याचा सण पहिल्या दिवशी साजरा होणार.
 
* जर दशमी दोन दिवसाची असल्यास(मग ती दुपारची असो किंवा नसो)पण श्रवण नक्षत्र दुसऱ्या दिवशी दुपारच्या कालावधीत असल्यास दसऱ्याचा सण दुसऱ्या दिवशी साजरा होणार.
 
* जर दशमी तिथी दोन्ही दिवस असल्यास, परंतु दुपारच्या कालावधीत पहिल्या दिवशी असल्यास अश्या परिस्थितीत दुसऱ्या दिवशी दशमी तिथी पहिल्या तीन मूहुर्तात असणार आणि श्रवण नक्षत्र दुसऱ्या दिवशी दुपारच्या कालावधीत असेल तर दसराचा सण दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणार.
 
* जर दशमी पहिल्या दिवशी दुपारच्या कालावधीत असल्यास आणि दुसऱ्या दिवशी तीन मुहूर्तापेक्षा कमी असल्यास तर अश्या स्थितीमध्ये दसराचा सण पहिल्याच दिवशी साजरा होणार. या मध्ये श्रवण नक्षत्राच्या कोणत्याही परिस्थितीला नकार दिला जाणार.
 
* अश्या परिस्थितीत यंदा 25 ऑक्टोबर रोजी नवमी सकाळी 7:41 पर्यंत असणार. त्या नंतर दशमी लागणार. अश्या वेळी दशमीची तिथी 26 ऑक्टोबर सकाळी 9 वाजे पर्यंतच असणार. या मुळे यंदाच्या 2020 वर्षीचा दसरा 25 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. तर दुर्गा विसर्जन 26 ऑक्टोबर रोजी होणार.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती