अनोश्यापोटी केळ खाऊ नये, असे त्रास होऊ शकतात

शनिवार, 17 ऑक्टोबर 2020 (09:10 IST)
केळ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये बरेच पोषक घटक मुबलक प्रमाणे आढळतात. जे आपल्या आरोग्यास फायदेशीर असतात. हे शरीराच्या भुकेला कमी करून चरबी कमी करतं, कारण या मध्ये आरोग्यवर्धक चरबी असते. जी आपल्या शरीरात साचत नाही आणि वजन देखील वाढवते, पण लठ्ठपणा दूर करते. फक्त ते खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत माहीत असावी. बऱ्याचदा लोकं कामावर जाण्याच्या घाईमुळे अनोश्यापोटीच केळ खातात, कारण त्यांना वाटतं की केळ हे ऊर्जा देणारे फळ आहे आणि हे खाल्ल्याने आपल्याला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा किंवा शक्ती मिळेल, पण तज्ज्ञ म्हणतात की अनोश्यापोटी केळ खाऊ नये. यामुळे आरोग्याशी निगडित बरेच तोटे संभवतात. 
 
* अनोश्यापोटी केळ खाणं पचनासाठी चांगले नाही - 
केळ्यात पोटॅशियम, फायबर आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळतात, परंतु याचा सह हे फळ ऍसिडीक देखील असतं आणि तज्ज्ञ सांगतात की अनोश्यापोटी ऍसिडीक खाद्य पदार्थांचे सेवन केल्यानं पचनाशी निगडित त्रास उद्भवू शकतात. म्हणून अनोश्या पोटी केळ खाऊ नका.
 
* अनोश्यापोटी केळ खाणं हृदयासाठी हानिकारक आहे - 
केळ्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळतात, म्हणून ह्याचे अनोश्यापोटी सेवन केल्यानं रक्तात या दोन्ही घटक चे प्रमाण जास्त होऊ शकतात, जेणे करून आपल्या हृदयाला नुकसान होऊ शकतं. म्हणून अनोश्यापोटी केळ खाण्याचा पूर्वी एकदा विचार करावा.
 
* अनोश्यापोटी केळ खाल्ल्यानं थकवा आणि सुस्ती होऊ शकते -
जर आपण असा विचार करता की केळ खाल्ल्यानं आपल्याला दिवसभरासाठी ऊर्जा मिळेल तर आपण योग्य विचार करता, पण हे अनोश्यापोटी अजिबात खाऊ नये, कारण अनोश्यापोटी केळ खाल्ल्याने आपल्या ला त्वरित ऊर्जा तर मिळेल पण ती तात्पुरती असणार. त्यामुळे आपल्याला लगेच थकवा आणि सुस्ती जाणवणार आणि परत भूक लागेल. त्यामुळे आपल्याला अती खाण्याच्या त्रासाला सामोरी जावं लागणार. म्हणून सकाळी आपण सकाळच्या न्याहारीत केळ्याचा समावेश करावा, पण अनोश्यापोटी अजिबात खाऊ नये. 
 
* रात्री झोपण्याच्या पूर्वी केळ खावं का? - 
बहुतेक लोकं रात्री झोपण्याचा पूर्वी केळ खातात. असे करू नये, कारण रात्रीच्या वेळी केळ खाल्ल्यानं आपण आजारी होऊ शकता. या मुळे आपल्याला खोकला होऊ शकतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती