वाईट काळ असल्यास हे उपाय करा

बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (09:47 IST)
सगळ्यांचा आयुष्यात वाईट काळ तर येतोच. कोणीही या पासून वाचू शकलेलं नाही. पण कालावधीने हा काळ देखील सरून जातो. पण एखाद्या वेळी या काळाची अवधी अधिक काळाची असल्यास शास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय आणि नियम पाळल्याने आपले सर्व काम होऊन आपले त्रास नाहीसे होतात. हे उपाय खालील प्रमाणे आहे.
 
* दररोज नियमानं सूर्योदयाच्या वेळी सूर्याला पाण्याने अर्घ्य द्यावा आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. सूर्याला प्रत्यक्षात सूर्य नारायण म्हटले आहे आणि सूर्याच्या उपासनेने वाईट काळाचा देखील नाश करता येतो.
 
* शुक्रवारी महालक्ष्मीचे उपवास केल्याने आणि श्री कनकधारा स्तोत्राचे पठण केल्यानं विपरीत काळ देखील अनुकूल बनतो आणि सर्व त्रास नाहीसे होतात. बेरोजगारी आणि आर्थिक त्रास संपतात.
 
* पिंपळाच्या झाडाची सेवा केल्यानं आणि नियमानं अश्वत्थस्तोत्राचे पठण केल्यानं देखील वेळ अनुकूल होते आणि आरोग्य देखील चांगले होतं. एखादे गम्भीर आजार असल्यास तो देखील बरा होतो.
 
* गुरुवारच्या दिवशी श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्यानं दारिद्र्य दूर होतं आणि धनागमनाचे स्रोत प्रबळ होतात. 
 
* मंगळवारच्या दिवशी बजरंगबाणाचे पठण केल्यानं सर्वात मोठा तंत्र-मंत्र अडथळा आणि शारीरिक त्रास संपतो.
 
* महालक्ष्मीला कमळ गट्ट्याची माळ आणि कमळाचे फूल अर्पित केल्यानं वाईट वेळ अनुकूल होतो.
 
* प्रदोषाचे उपवास केल्यानं आणि शिव तांडव स्तोत्राचे पठण केल्यानं वाईट काळ संपतो आणि प्रगतीचे मार्ग उघडतात.
 
* शनीने ग्रस्त असलेल्या माणसाला दशरथकृत शनी स्तोत्राचे पठण केले पाहिजे आणि शनीचे दहा नावांचे नियमितपणे पठण केले पाहिजे.
 
* माता बगळामुखीचे दर्शन आणि मूलमंत्राचे जाप केल्यानं कोर्ट कचेरी आणि सरकारी त्रासापासून मुक्ती मिळते.
 
* तुळशीच्या रोपट्याची सेवा आणि पूजा केल्यानं वाईट काळ अनुकूल होतो. हे उपाय केल्यानं आपल्या घरात धनाची देवी लक्ष्मीचे आगमन होतं.
 
* कर्जापासून मुक्तीसाठी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण मंगळवारी करावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती