कर्जमुक्तीसाठी मंगळवारी करा 'ऋणमोचक मंगल स्तोत्राचा' पाठ; जाणून घ्या अचूक विधी आणि महत्त्व

सोमवार, 23 फेब्रुवारी 2026 (18:17 IST)
बदलत्या जीवनशैलीत घर, गाडी किंवा व्यवसायासाठी कर्ज घेणे ही सामान्य बाब झाली आहे. मात्र कधीकधी हेच कर्ज डोईजड होते आणि फेडता फेडता नाकीनऊ येते. ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला 'ऋणहर्ता' मानले जाते. जर तुम्ही कर्जाच्या विळख्यात अडकला असाल, तर 'ऋणमोचक मंगल स्तोत्र' तुमच्यासाठी वरदान ठरू शकते.
 
मंगळवारचे महत्त्व का?
मंगळ हा धैर्याचा आणि उर्जेचा कारक ग्रह आहे. पत्रिकेतील मंगळ प्रबळ असल्यास व्यक्ती कर्जमुक्त होऊ शकते. मंगळवार हा हनुमान आणि मंगळ देव यांचा वार असल्याने या दिवशी केलेली उपासना लवकर फळाला येते, अशी श्रद्धा आहे.
 
'ऋणमोचक मंगल स्तोत्र' पठण विधी
हा पाठ करताना खालील नियमांचे पालन केल्यास अधिक लाभ होतो:
१. वेळ: मंगळवारी सूर्योदयाच्या वेळी किंवा सकाळी लवकर उठून स्नान करावे.
२. पूजा स्थान: घराच्या देव्हाऱ्यात किंवा शांत ठिकाणी लाल कापड अंथरून त्यावर मंगळ यंत्र किंवा हनुमानाची मूर्ती ठेवावी.
३. दिवा आणि अगरबत्ती: शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि लाल रंगाचे फूल अर्पण करावे.
४. संकल्प: हातात थोडे पाणी घेऊन "मी माझे कर्ज फिटावे म्हणून हे पठण करत आहे," असा संकल्प करावा.
५. पठण: मनोभावे 'ऋणमोचक मंगल स्तोत्राचे' कमीत कमी १ किंवा ११ वेळा पठण करावे.
 
ऋणमोचक मंगल स्तोत्र
मङ्गलो भूमिपुत्रश्च ऋणहर्ता धनप्रदः ।
स्थिरासनो महाकयः सर्वकर्मविरोधकः ॥1।।
 
लोहितो लोहिताक्षश्च सामगानां कृपाकरः ।
धरात्मजः कुजो भौमो भूतिदो भूमिनन्दनः॥2।।
 
अङ्गारको यमश्चैव सर्वरोगापहारकः ।
व्रुष्टेः कर्ताऽपहर्ता च सर्वकामफलप्रदः॥3।।
 
एतानि कुजनामनि नित्यं यः श्रद्धया पठेत् ।
ऋणं न जायते तस्य धनं शीघ्रमवाप्नुयात् ॥4।।
 
धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभम् ।
कुमारं शक्तिहस्तं च मङ्गलं प्रणमाम्यहम् ॥5।।
 
स्तोत्रमङ्गारकस्यैतत्पठनीयं सदा नृभिः ।
न तेषां भौमजा पीडा स्वल्पाऽपि भवति क्वचित् ॥6।।
 
अङ्गारक महाभाग भगवन्भक्तवत्सल ।
त्वां नमामि ममाशेषमृणमाशु विनाशय ॥7।।
 
ऋणरोगादिदारिद्रयं ये चान्ये ह्यपमृत्यवः ।
भयक्लेशमनस्तापा नश्यन्तु मम सर्वदा ॥8।।
 
अतिवक्त्र दुरारार्ध्य भोगमुक्त जितात्मनः ।
तुष्टो ददासि साम्राज्यं रुश्टो हरसि तत्ख्शणात् ॥9।।
 
विरिंचिशक्रविष्णूनां मनुष्याणां तु का कथा ।
तेन त्वं सर्वसत्त्वेन ग्रहराजो महाबलः ॥10।।
 
पुत्रान्देहि धनं देहि त्वामस्मि शरणं गतः ।
ऋणदारिद्रयदुःखेन शत्रूणां च भयात्ततः ॥11।।
 
एभिर्द्वादशभिः श्लोकैर्यः स्तौति च धरासुतम् ।
महतिं श्रियमाप्नोति ह्यपरो धनदो युवा ॥12।।
 
।।इति श्री ऋणमोचक मङ्गलस्तोत्रम् सम्पूर्णम्।।
 
पठणाचे फायदे
कर्जमुक्ती: सततच्या पठणामुळे धनलाभाचे मार्ग मोकळे होतात आणि जुने कर्ज फिटण्यास मदत होते.
आर्थिक स्थैर्य: घरातील दरिद्री दूर होऊन लक्ष्मीचा वास टिकून राहतो.
जमीन-जुमल्याचे वाद: जर जमिनीशी संबंधित काही कोर्टकचेरी सुरू असेल, तर त्यात यश मिळते.
 
अजून काय करावे?
मंगळवारी शक्य असल्यास लाल रंगाचे कपडे परिधान करावेत.
या दिवशी कोणालाही नवीन कर्ज देऊ नका आणि शक्य असल्यास कर्जाचा एखादा हप्ता या दिवशी भरा, ज्यामुळे कर्ज लवकर फिटते.
'ओम अं अंगारकाय नमः' या मंत्राचा जप करावा.
 
टीप: हा लेख धार्मिक श्रद्धा आणि ज्योतिषशास्त्रीय माहितीवर आधारित आहे. कष्टाला उपासनेची जोड दिल्यास यश नक्की मिळते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती