वास्तुनुसार घरात हे बदल करा आणि भाग्यवान व्हा

शनिवार, 17 ऑक्टोबर 2020 (09:01 IST)
निसर्गामध्ये अशे सामर्थ्य आहे ज्यामुळे आपण आपली सकारात्मक ऊर्जेला विकसित करू शकता. ज्यामुळे आपण भाग्यवान होऊ शकता. नशिबात वेळ आणि स्थळ याचे फार महत्त्व आहे. एखादे चुकीचे ठिकाणी राहिल्यानं किंवा जाण्याने आपले नशीब थांबतं. नशिबात कर्म देखील महत्त्वाचं आहे. चुकीचं काम केल्याने देखील नशीब मंदावत. आम्ही आपणास नशिबाला जागृत करण्याचे सोपे उपाय सांगत आहोत. 
 
घराला भाग्यवर्धक बनवा -
1 घराचे दार उत्तर दिशेला किंवा ईशान्य कोणेत असल्यास सर्वात उत्तम असतं, पूर्वीकडे असल्यास उत्तम आणि पश्चिमेकडे असल्यास मध्यम मानलं जात. घरातील नैरृत्य कोणात (दक्षिण-पश्चिम क्षेत्रात) अंधार असू नये तसेच वायव्य कोण (उत्तर-पश्चिम क्षेत्रात) जास्त उजेड असू नये. घरात तुळस असल्यास अनेक प्रकाराचे वास्तू दोष दूर होतात. तुळशी जवळ दररोज संध्याकाळी दिवा लावावा.
 
2 घर नेहमी स्वच्छ ठेवा आणि घरात अनावश्यक, तुटलेल्या फाटलेल्या वस्तू जुनं अडगळीचं सामान जुने फाटके कापडे नसावे.
 
3 घरात बऱ्याच देवांच्या मुरत्या किंवा चित्र ठेवू नये. नकारात्मक चित्रे जसे की ताजमहालच चित्र, काटेरी झाडाचं चित्र लावू नये.
 
4 घरातील ईशान कोपरा नेहमीच रिकामा ठेवावा किंवा त्याला पाण्याचे स्थळ बनवा. 
 
5 घराच्या दारावर भगवान गणेशाचं चित्र आणि उजव्या आणि डाव्या बाजूस स्वस्तिकासह शुभ- लाभ लिहिलेलं असावं.
 
6 सकाळ संध्याकाळ घरात सुमधुर संगीत आणि सुवासाने वातावरणाला चांगलं बनवा.
 
7 रात्री झोपण्यापूर्वी तुपात भिजवलेला कापूर पेटवावं.
 
8 घरच्या भोवती नकारात्मक ऊर्जा असणारे झाडे असल्यास त्यांचा पासून सावध राहावं.
 
9  घरात वारे येण्याचे मार्ग असे असावे की घरात हवा खेळती असावी. 
 
10 तीन दार एकाच सरळ रेषेत नसावे. हवा एकी कडून येऊन दुसरी कडून निघणारे दार नसावे.
 
11 घरात नेहमी या वस्तू ठेवाव्या. रुद्राक्ष, शंख, घंटाळी, स्वस्तिक चिन्ह, ऊँ लॉकेट, कलश, गंगाजल, मौली, कमळगट्टे, तुळस, किंवा रुद्राक्षाची माळ, शाळिग्राम, पंच देवाची पितळ्याची मूर्ती, भिंतीवर लागलेलं निसर्गाचं चित्र किंवा एखाद्या हसणाऱ्या कुटुंबाचं चित्र.
 
12 केळी, तुळस, मनी प्लांट, डाळिंब, पिंपळ, वटवृक्ष, अंबा, पेरू, कढीपत्ता, चंपा, जाई, पारिजातक, वैजयंती, रातराणी हे झाडे लावावे.
 
13 आठवड्यातून एकदा(गुरुवारच्या दिवसाला वगळून) समुद्री मिठाने फरशी पुसावी. यामुळे घरात शांतता नांदते. घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते घरात वाद देखील होत नाही आणि लक्ष्मीचे वास्तव्य कायमचे राहते.
 
14 बऱ्याच लोकांच्या घरात वस्तूच्या रूपात कामधेनू गाय, गाय - वासरू, नर्मदा-शिवलिंग, श्वेतार्क गणपती, सिंघम लक्ष्मी, शंख, नजरबट्टू, बत्तख किंवा हंसाची जोडी, द्वारिका शिळा, नागमणी, पारद शिवलिंग, हिराशंख, गोमती चक्र, श्रीयंत्र, गौरोचंन, मासेघर, शिवलिंग, शाळिग्राम, दक्षिणावर्ती शंख, मणी, नग, कवडी, समुद्री मीठ, हळकुंड रुद्राक्ष, हाताजोडी, पारद शिवलिंग, इत्यादी असंख्य वस्तू असू शकतात, पण घरात कोणती वस्तू कुठे ठेवायची या साठी वास्तू तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.
 
15 घरातील स्वच्छतागृह आणि स्नानगृह नेहमी स्वच्छ आणि सुवासिक ठेवा. कारण हे ठिकाण राहू आणि चंद्राचं आहे. 
 
16 घराच्या वस्तूंना वास्तुनुसार ठेवून दररोज घराला स्वच्छ करून उंबऱ्याची पूजा करावी. घराच्या बाहेर उंबऱ्या जवळ स्वस्तिक बनवावं आणि हळद-कुंकू वाहून दिवा लावावा. तसेच दररोज सकाळ संध्याकाळ कापूर लावावा आणि घरातील वातावरणाला सुवासिक बनवावं. जे नियमितपणे उंबऱ्याची पूजा करतात, उंबऱ्याच्या जवळ तुपाचा दिवा लावतात, त्यांचा घरात लक्ष्मी कायमची वास्तव्यास असते.
 
17 नर आणि नारायण दक्षिणावर्ती शंखात बासमती तांदूळ भरून चांदीचे नाणे टाकून माळ बांधून आपल्या तिजोरीत ठेवल्यानं दारिद्र्याचा नाश होतो. धन आणि समृद्धी मिळते. आपण आपल्या तिजोरीत पिवळी कवडी, किंवा हळकुंड देखील ठेवू शकता. तांबे, चांदी, आणि पितळ्याचे 100 किंवा 200 नाणे एकत्र करून एका कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे. तिजोरीत अत्तराची बाटली देखील ठेवा किंवा अष्टगंध देखील ठेवू शकता. आता तिजोरी उघडल्यावर सुवास दरवळत राहो. जेणे करून आपल्या घरात बरकत येईल. 
 
18 आपल्या घरात तुटकी खुर्ची किंवा टेबल असल्यास त्याला त्वरितच घरातून बाहेर काढून द्या. हे आपल्या प्रगतीत आणि येणाऱ्या पैशात अडथळे आणतात. बैठकीतला सोफा देखील फाटका किंवा तुटलेला नसावा. त्यावर अंथरलेली चादर देखील फाटकी आणि घाणेरडी नसावी. सोफा, खुर्ची, टेबल यांचे पण वास्तू असतात. दिसायला सुंदर आणि स्वच्छ असल्यास त्यांचे आकार घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात. म्हणून वास्तू तज्ज्ञाला विचारूनच वस्तू खरेदी करा.
 
19 घराच्या खिडक्यांमधून किंवा दारामधून नकारात्मक वस्तू दिसत असल्यास, जसे की सुकलेले झाड, कारखान्याच्या चिमणीमधून निघणारे धूर, असे दिसू नये त्यासाठी खिडक्यांना आणि दाराला पडदा लावा.
 
20 घराच्या मुख्य दाराच्या समोर किंवा जवळपास विजेचे खांब, ट्रान्सफार्मर किंवा एखादे झाड लागलेले असल्यास हे दार वेध असतात. या मुळे घरातील सदस्यांना आपल्या प्रत्येक कामात अडथळे आणि अपयशाला सामोरी जावे लागणार. घराच्या जवळ एखादे वाळलेले झाड असल्यास त्याला त्वरीतच घराच्या समोरून काढून टाका. घराच्या जवळ घाण गटार, घाण तलाव किंवा स्मशान भूमी किंवा कब्रिस्तान नसावे. या मुळे देखील वातावरणात मोठा फरक पडतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती