विजयादशमी 2020 : दसरा केव्हा आहे, दिनांक व शुभ मुहूर्त

बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (12:19 IST)
अश्विन महिन्यात दशमी तिथीला संपूर्ण देशात दसरा किंवा विजयादशमीचा सण म्हणून मोठ्या थाटाने साजरा केला जातो. दुर्गापूजनाच्या दशमीला साजरा होणारा दसऱ्याचा सण वाईटावर चांगल्याच आणि असत्यावर सत्याचा विजय मिळवण्याचा आहे. अशी आख्यायिका आहे की दसरा किंवा विजयादशमीला शुभ मुहूर्त बघितल्या शिवाय देखील शुभ कार्य करता येऊ शकतं. 
 
ज्योतिषांच्या मते या दिवशी केलेल्या नवीन कार्यात यश मिळतं. दसऱ्याच्या दिवशी श्रीराम, देवी आई दुर्गा, श्री गणेश आणि हनुमानाची पूजा करून कुटुंबाच्या चांगल्या होण्याची प्रार्थना केली जाते. आख्यायिका आहे की दसऱ्याला रामायण पाठ, सुंदरकांड, श्रीराम रक्षा स्रोताचे वाचन केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.
 
मांगलिक कार्यासाठी हे दिवस शुभ मानतात - 
दसरा किंवा विजयादशमी सर्वसिद्दीदायक तिथी मानली जाते. या दिवशी केलेले सर्व शुभ कामे फलदायी मानले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार, दसऱ्याच्या दिवशी मुलांची अक्षर उजळणी, घर किंवा दुकानाचे बांधकाम, गृह प्रवेश, जावळ, बारसे, अन्नप्राशन, कर्णछेदन, मौंज संस्कार आणि भूमी-पूजन हे सर्व कार्य शुभ मानले आहेत. विजयादशमी किंवा दसऱ्याला विवाह सोहळा निषिद्ध मानला आहे.
 
दसरा कधी आहे ते जाणून घेऊया - 
हिंदू पंचांगानुसार, यंदाच्या वर्षी दसरा किंवा विजयादशमीचा सण 25 ऑक्टोबर रोजी साजरा केला जात आहे. दसऱ्याचा सण दिवाळीचा 20 दिवस आधी दरवर्षी साजरा केला जातो. तसे यंदाचे नवरात्र 9 दिवसाचे नसून 8 दिवसातच संपत आहेत. यंदाच्या वर्षी अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी येत आहे. यंदा 24 ऑक्टोबर सकाळी 6 वाजून 58 मिनिटापर्यंत अष्टमी आहे, त्या नंतर नवमी लागत आहे. त्यामुळे दसरा यंदा 25 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे.
 
शुभ मुहूर्त - 
दशमी तिथीची सुरवात -  25 ऑक्टोबर रोजी 07:41 मिनिटा पासून 
विजय मुहूर्त - सकाळी 01:55 ते दुपारी 02 वाजून 40 मिनिटा पर्यंत 
दुपारी पूजेचा मुहूर्त - 01:11 मिनिटा ते 03:24 मिनिटांपर्यंत
दशमी तिथी समाप्ती - 26 ऑक्टोबर 08:59 मिनिटांपर्यंत असणार
 
पौराणिक गोष्ट -
एका पौराणिक कथेनुसार, या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामाने लंकापती रावणाचा वध केला. भगवान रामाची रावणावर विजय मिळवल्या मुळे या दिवसाला विजयादशमी म्हणतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती