1 असुरांचा वध : सर्वप्रथम या दिवशी आई दुर्गेने महिषासुराचा वध केला असे. रम्भासुराचा मुलगा महिषासुर होता, जो फार सामर्थ्यवान होता. त्यांनी कठोर तपश्चर्या करून परमपिता ब्रह्माला प्रसन्न केले. त्यावर ब्रह्माजींनी प्रगट होऊन त्याला म्हणे 'बाळ तू मृत्यूला सोडून, काही ही मागणी कर' महिषासुराने फार विचार केला आणि म्हणे - ठीक आहे देवा माझी मृत्यू असुर आणि मानव कोणाकडून ही न होवो. माझी मृत्यू एखाद्या बाई कडून व्हावी अशी माझी इच्छा आहे. ब्रह्माजी तथास्तु म्हणून निघून गेले.
ब्रह्माजीं कडून वर मागून त्याने तिन्ही लोकांवर आपले आधिपत्यं गाजवले आणि त्रिलोकाधिपती बनला. तेव्हा सगळ्या देवी-देवांनी मिळून आई भगवती महाशक्तीला बोलावले त्यांची पूजा केली. सर्व देवी-देवांच्या शरीरातून एक तेजःपुंज निघाले आणि त्यापासून एका सुंदर स्त्रीचे निर्माण झाले. हिमवान यांनी तिला वाहन म्हणून सिंह दिले. सर्व देवांनी आपले अस्त्र शस्त्र महामायाच्या सेवेत दिली. भगवतीने प्रसन्न होऊन त्यांना लवकरच महिषासुराच्या भीतीपासून मुक्त करण्याचे आश्वासन दिले.