ENG vs AUS :विश्वचषकाच्या 36व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 33 धावांनी पराभव केला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 286 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ 253 धावा करू शकला आणि सामना गमावला. या पराभवासह इंग्लंड उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला. यासोबतच ऑस्ट्रेलियाने अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्याचा दावा मजबूत केला.