हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आजचा सामना जिंकणाऱ्या संघाला उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहणे सोपे जाईल, परंतु या सामन्यापूर्वी चिन्नास्वामीमध्ये पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पावसाने सामन्यात व्यत्यय आणल्यास दोन्ही संघांना 1-1 गुणांवर समाधान मानावे लागू शकते.
एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तान नेहमीच न्यूझीलंडपेक्षा वरचढ राहिला आहे. या स्पर्धेत उभय संघांमध्ये आतापर्यंत एकूण 9 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 7 सामने पाकिस्तानने तर 2 सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत.
पाकिस्तानः अब्दुल्ला शफीक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), इफ्तिखार अहमद, सौद शकील, आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, हसन अली, मोहम्मद वसीम जूनियर, हरिस रौफ.
न्यूझीलंड: डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट.