सक्रिय रुग्णांची संख्या साडे तीन लाखांच्या आत, 29,177 जणांना डिस्चार्ज

सोमवार, 24 मे 2021 (07:52 IST)
राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या साडे तीन लाखांच्या आत आली आहे. रविवारी 2329 हजार 177 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
 
आरोग्य विभागाच्या वतीने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 26 हजार 672 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली, यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 55 लाख 79 हजार 897 एवढी झाली आहे. त्यापैकी 51 लाख 40 हजार 272 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
 
सध्या राज्यात 3 लाख 48 हजार 395 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 594 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 88 हजार 620 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.59 टक्के एवढा आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढला असून, सध्या 92.12 टक्क्यांवर पोहोचला आहे.
 
राज्यात आतापर्यंत 3 कोटी 30 लाख 13 हजार 516 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 26 लाख 96 हजार 306 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 21 हजार 771 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती