राज्यातल्या २२ जिल्ह्यांमध्ये साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक आहे. यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. राज्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट सरासरी २३.८२ टक्के इतका आहे. त्या तुलनेत २२ जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट उच्चांकी पातळीवर आहे. त्यामुळे या जिल्ह्यात लसीकरण, प्रतिबंधात्मक उपाययोजना, चाचण्या वाढवण्यावर अधिक भर देण्यात यावा असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य विभागाने सादर केलेल्या माहितीनुसार मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे आणि नाशिकमध्ये २० ते २६ जानेवारी या काळात एकूण १,७६,५८७ नवीन रुग्ण सापडले आहेत.