राज्यात ३५ हजार ७५६ नवीन करोना रुग्ण

गुरूवार, 27 जानेवारी 2022 (08:38 IST)
महाराष्ट्रात बुधवारी ३५ हजार ७५६ नवीन करोना रुग्ण आढळले. यासह राज्यातील एकूण करोना रूग्णांची संख्या ७६ लाख ५ हजार १८१ इतकी झालीय. यापैकी सध्या एकूण २,९८,७३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात बुधवारी एकही ओमायक्रॉन बाधित रूग्ण आढळला नाही. सध्या ओमायक्रॉनबाधितांची संख्या २ हजार ८५८ इतकी आहे. यापैकी १ हजार ५३४ रुग्णांना त्यांची आर. टी. पी. सी. आर. चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
 
राज्यात  बुधवारी एकूण ३९ हजार ८५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत राज्यात एकूण ७१ लाख ६० हजार २९३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.१५ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ७९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के एवढा आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात १ लाख ४२ हजार ३१६ करोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती