सौदीची मक्का मदिना प्रवास करण्यास मनाई

गुरूवार, 5 मार्च 2020 (16:34 IST)
सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेल्या वक्तव्यात म्हटले की आम्ही सर्व देशांचा एंट्री व्हिजा निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसवर नियंत्रण करण्यासाठी सौदी अरब पूर्ण जगासोबत आहे.
 
मुस्लिमांच्या पवित्र स्थळ मक्का आणि मदीनाच्या प्रवासावर सौदी अरेबियाने बंदी घातली आहे. दरवर्षी हज यात्रेच्या आधी सौदीने हे पाऊल उचलले आहे. आतापर्यंत मध्ये पूर्व देशांमध्ये कोरोनाच्या संक्रमणाचे 220 प्रकरण समोर आले आहे. मक्का व्यतिरिक्त अरबने मदीनामध्ये स्थित पैगंबर मोहम्मद यांच्या मशिद प्रवासावर देखील रोक लावली आहे.
 
देशाच्या नागरिकांना कोरोना व्हायरस प्रभावित देशांचा प्रवास टाळण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती