कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ७ केंद्रीय पथकं महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

बुधवार, 4 मार्च 2020 (10:23 IST)
कोरोना प्रतिबधंक उपायांचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारची सात पथकं आज राज्यांना आणि विशिष्ट विमानतळांना भेट देणार आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नवी दिल्ली इथं घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. ही पथकं नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई बेंगळुरू, हैदराबाद आणि कोची विमानतळांना भेट देतील. या पथकात सार्वजनिक आरोग्य तज्ञ, आरोग्यचिकित्सक आणि सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ तज्ञांचा समावेश असेल.
 
विमानतळ संलग्न रुग्णायलयात उभारलेल्या विशेष वॉर्डचा तसंच मास्क आणि इतर सुरक्षा उपकरणांच्या उपलब्धतेचाही आढावा या पथकाकडून घेतला जाईल. राज्याच्या आरोग्य सचिवालयांशी समन्वय साधून उपाययोजना अधिक चोख करण्यासाठी विविध मार्ग हे पथक शोधणार आहे, असंही आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे.
 
याशिवाय चोवीस तास चालणार्याे राष्ट्रीय रोग प्रतिबंधक कॉल सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत कोरोना ग्रस्त एकही रुग्ण सापडलेला नाही, मात्र 11 जणांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे, असंही डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती