दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटला

मंगळवार, 3 मार्च 2020 (16:37 IST)
दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी जळगावमध्ये पेपर फुटला. जळगावातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर फुटला आहे. कॉपीबहाद्दरांकडून मराठीचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल करण्यात आला आहे. 
 
परीक्षेवेळी होणार्‍या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून प्रयत्न करण्यात येत असतात. त्यानुसार यंदा परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडू नयेत यासाठी राज्य शिक्षण मंडळाने संपूर्ण राज्यामध्ये तब्बल २७३ भरारी पथके तैनात केली आहेत. 
 
याप्रकारामुळे केंद्रप्रमुख हेतूपुरस्पर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. तसंच कॉपीबहाद्दरांचा तालुक्यातील एका केंद्रावर मोठ्या प्रमाणात सुळसुळाट आहे. तसंच शाळेचा निकाल जास्त लागण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचा आरोप आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती