तसेच सरकारने ट्रेनने प्रवास करु नका असं आवाहन केल्यावर देखील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून आली. अखेर 22 मार्च रोजी सरकारने रेल्वे पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर रेल्वेने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेण्याचे आवाहान भारतीय नागरिकांना केलं आहे. यासाठी रेल्वेचेच उदाहरण देण्यात आलं आहे.
अगदी कमी शब्दात जनतेला समजवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. रात्री सव्वाबारा वाजता रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलेल्या ट्विटमध्ये, भारतीय रेल्वे युद्धाच्या काळातही कधी थांबली नव्हती. कृपा करुन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्या आणि घरीच थांबा, असं म्हटलं आहे.
अवघ्या काही तासांमध्ये हजारों लोकांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे. आणि हे आवाहन सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.