दिल्लीत करोना स्फोट, रुग्ण संख्येत मुंबईलाही मागे सोडले

गुरूवार, 25 जून 2020 (15:41 IST)
गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं रुग्णसंख्या वाढत असलेल्या दिल्लीनं मुंबईलाही मागे सोडलं आहे. देशात करोनाचा शिरकाव झाल्यापासून सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत मुंबई पहिल्या क्रमांकावर होती. बुधवारी दिल्लीत ३ हजार ७८८ रुग्ण आढळून आले. त्यामुळे दिल्लीतील रुग्णसंख्या ७० हजारांच्या पुढे गेली आहे.
 
करोना रुग्णसंख्येत देशाची राजधानीनं आर्थिक राजधानीला मागे टाकलं आहे. बुधवारी दिल्लीत ३ हजार ७८८ जणांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे दिल्लीतील रुग्णसंख्या ७० हजार ३९० वर पोहोचली. तर मुंबईतील रुग्णसंख्येत १ हजार ११८ रुग्णांची भर पडली, त्यामुळे मुंबईतील आकडा ६९,५२८ इतकी झाली आहे.
 
दिल्लीमध्ये आतापर्यंत ४.२ लाख टेस्ट करण्यात आल्या आहेत. तर मुंबईत २.९४ लाख टेस्ट करण्यात आल्या आहेत. पॉझिटिव्हीटी रेटमध्ये मुंबई दिल्लीपेक्षा जास्त आहे. मुंबईतील पॉझिटिव्हीटी रेट २३.२ टक्के, तर दिल्लीचा १६.७ टक्के आहे. रुग्णांच्या मृत्यूची संख्या मुंबईत दिल्लीपेक्षा जास्त आहे. मुंबईत करोनामुळे ३ हजार ९६४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीत २ हजार ३६५ जणांचा मृत्यू झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती