एक काळ असा होता की, अंडरटेकर या नावाचे प्रचंड वलय होते. डब्ल्यूडब्ल्यूइ ही कुस्ती सुरु झाली की, सर्वांनाच अंडरटेकरला पाहण्याची इच्छा व्हायची. गेली तीस वर्षे त्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केले. तो जेव्हा रिंगमध्ये जाण्यासाठी तयार व्हायचा, तेव्हा सर्व लाईट्स बंद करण्यात यायच्या.सुरुवातीला त्याच्याबरोबर एक कलश घेऊन व्यक्ती यायची. या डेडमॅनच्या अस्थी या कलशामध्ये आहेत, अशी त्यावेळी अफवाही पसरली होती. डब्ल्यूडब्ल्यूइमधील अंडरटेकरची एंट्री ही भन्नाट असायची. सर्व लाइट्स बंद असताना तो यायचा. काळे कपडे त्याने परिधान केलेले असायचे, त्याचबरोबर काळी हॅटही तो वापरायचा. त्याची एंट्री एवढी भीतीदाक होती की, त्यावेळी बरीच लहान मुले घाबरायची. त्याचे डोळे पाहण्यासाठीही बरेच चाहते उत्सुक असायचे.